आनंद बुद्ध विहार घोडेगाव येथे “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ वाचन सांगता समारोह संपन्न…

तेल्हारा – चेतन दही सह गोकुळ हिंगणकार

तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम घोडेगाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या पावसाळ्याच्या दिवसात आनंद बुद्ध विहार येथे वर्षावासानिमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण उपासक उपासिका साठी करण्यात आला होता त्या ग्रंथाचा सांगता समारोप मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

या सांगता समारोपा साठी पूज्य भन्ते राजज्योती तथा भदंत तिस्सवंस व भिक्कू संघ यांची उपस्थिती लाभली. पूज्य भन्ते राजज्योती हे धुत्तांगधारी भंतेजी असून त्यांनी आपल्याअमोघ वाणीतून पंचक्रोशीतील जमलेले उपासक तथा उपासिका यांना धम्मदेसना दिली.विशेष म्हणजे भन्ते राजज्योती यांची सामाजिक धम्मक्रांती अभियना अंतर्गत आजच्या मोबाईलच्या युगात तरुण वर्ग धम्मापासून दुरावत आहे त्यांना धम्माची गोडी लागण्यासाठी संपूर्ण अकोला जिल्हा पदयात्रेने पिंजून काढत आहेत.

त्यातही आनंद बुद्ध विहार येथे भंतेजीच्या प्रवचनाने धम्माग्रंथ सांगता समरोपास जणू काही दुग्धशर्करा योग आला. संपूर्ण घोडेगावातील वातावरण तथागताच्या मंगल मैत्रीत न्हावून निघाले.सदर कार्यक्रम यशस्वीतेस नालंदा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष देविदास दामोदर,विनोद दामोदर,सागर दामोदर, प्रभाकर दांडगे, लक्ष्मण दामोदर, भिकाजीं दामोदर, सुभाष दामोदर, विकास दामोदर, भानुदास दामोदर,मनोज दामोदर, कुंदन मनवर,

संदीप दामोदर, तथा सर्व नलंदा क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी तथा महाप्रजापती महिला मंडळाच्या रमाबाई आग्रे, मंगलाबाई घ्यारे,रेखा दांडगे, संगीता आटकर,शितल दामोदर, दीपाली दामोदर, लक्ष्मी दामोदर सुनंदा दामोदर, संगीता दामोदर तथा संघनायक रवि दामोदर इ सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here