मूर्तिजापूर येथील नगर परिषदेमध्ये शासकीय बांधकामाची तोडफोड प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे गुन्हा दाखल…

मूर्तिजापूर येथील नगरपरिषदेचे शौचालयाचे बांधकाम शासकीय कंत्राटदार रोहित राजकुमार लालवाणी यांनी घेतले असून ते बांधकाम त्यांनी पूर्ण केलेले आहे.
दि. १६/०४/२०२१ ते १७/४/२०२१ चे रात्री प्रसाधन गृहाचे शिटचे कुणीतरी अज्ञात इसमाने तोडफोड करून शासकीय बांधकामाचे नुकसान केले अशा प्रकारचा रिपोर्ट रोहित

लालवाणी यांनी दिनांक १७/०४/२०२१ रोजी पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर येथे दिला आहे. सदर तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे भादवि चे कलम ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.

हकीकत अशी आहे की प्राप्त माहितीनुसार, रोहित लालवाणी यांनी बांधकामाचे कंत्राट घेतल्यापासून काही इतर कंत्राटदारांचा त्रास त्यांना सुरू होता व त्या अनुषंगाने तर या शासकीय बांधकामाची तोडफोड करून नुकसान केले नसावे असा संशय मुर्तीजापुर येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तरीसुद्धा नगरपरिषदे मधील त्या रात्री वॉचमेन

म्हणून कोणाची ड्युटी होती अथवा कसे याबाबत पोलीस सखोल चौकशी करून खऱ्या आरोपीस पकडण्यात यशस्वी होतात किंवा नाही याबाबत मूर्तिजापूर येथील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अद्याप पर्यंत पोलिसांनी सदर घटनेबाबत कुठलीच कार्यवाही न करता सदर चा रिपोर्ट थंडबस्त्यात टाकल्याची माहिती प्राप्त आहे. सदरचे प्रकरण

हे अतिशय गंभीर असून अशाप्रकारे शासकीय बांधकामाचे तोडफोड करून नुकसान करणे बाबत मूर्तिजापूर पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करून आरोपीस अटक करावी अशी मागणी मूर्तिजापूर येथील जनतेमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here