दर्यापूर येथील भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोशन कट्यारमल यांच्या विरुद्ध 3 लाख खंडणीचा गुन्हा दाखल…

डॉक्टर इकबाल पठाण यांची पत्रकार परिषदेत माहिती


दर्यापूर :- (किरण होले)

शहरातील नामांकित असलेले एकता हॉस्पिटल हे गेल्या वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहे .दिनांक दोन मार्च २०२१ पासून सदर हॉस्पिटल येथे शासनाने कोविड्ड सेंटर उभारण्याची मंजुरी दिली होती तेव्हापासून दर्यापूर येथील भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोशन कट्यारमल यांनी हॉस्पिटलचे बदनामी करण्याच्या हेतूने फेसबुक अकाउंट वर वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ वर कमेंट केले आहेत .

त्यानंतर डॉक्टर इकबाल पठाण यांनी आरोपी राजाभाई घाणीवाले यांना हॉस्पिटलची सदर बदनामी करू नये यासंदर्भात सांगितले होते. परंतु बदनामी बंद करायचे असेल तर तीन लाख रुपये द्या असे रोशन कट्यारमल व राज्याभाई घानिवाले यांनी संगणमत करून डॉक्टर पासून आरोपींनी 50 हजार रुपये रक्कम बाबळी येथील मोठ्या पुलाजवळ वसूल केली. तरीही बदनामी करणे सुरूच ठेवले.

उर्वरित रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकी सुद्धा दोन्ही आरोपींनी दिली अशी माहिती डॉक्टर इकबाल पठाण यांनी 29 जून रोजी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. डॉक्टरांच्या या जबानी रिपोर्ट वरून दर्यापूर पोलीस स्टेशन येथे 28 जून रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास आरोपीविरुद्ध खंडणी वसूल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

व आरोपी विरुद्ध कलम 384,385,506,34 भा. द. वि.1860,66 बी माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008,कलम 4 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा वैयक्तिक आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम 2010 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दर्यापूर पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here