अकोटात आंबट शौकीन व्यापाऱ्याविरुद्ध महिलेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल…

अकोटात एका ३५ वर्षीय व्यापाऱ्याविरुद्ध एका महिलेने विनयभंग केल्याची अकोट शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अकोट शहराच्या राजस्थान चौकात स्थित राहणारे व्यापारी आजम खान वय ३५ वर्ष याने सोमवार वेस येथे फिर्यादी मार्केटमध्ये आली असता तिचा पाठलाग करून विनयभंग केला ,त्याच बरोबर आरोपी मागील दोन वर्षापासून तिला मोबाईलवर माझे सोबत चल मी तुला वागवितो असा प्रकारे त्रास देत असल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

याप्रकरणी अकोट पोलिसांनी आरोपी आजम खान याच्याविरुद्ध कलम 354 ,354 (D),भादवि गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here