ग्रामीण भागात निर्भय पत्रकारिता करणारे धाडसी पत्रकार स्वर्गीय पुंडलीकराव घायल…

दानापूर – गोपाल विरघट

ग्रामीण भागात पत्रकारीता करणे हे फार मोठी गोष्ट आहे ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकाराला विविध समस्यांना सामोरे जावे लागते त्यातीलच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय पुंडलिकराव घायल असे ते म्हणाले. दानापूर येथे आयोजित माजी सैनिक तथा जेष्ठ स्व:पुंडलीकराव घायल यांच्या 79 व्या स्मृती सोहळ्या दानापूर येथिल खोडे प्रतिष्ठान कोरोना नियमांचे पालन करून संपन्न झाला यावेळी उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ, तथा संपादक अजिंक्य भारत चे पुरुषोत्तम आवारे या वेळी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना फार मोठी तारेवरची कसरत यावेळी करावी लागत असते त्याचे कारण असे की ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना प्रत्येका सोबत त्या पत्रकाराची वैयक्तिक संबंध हे जोडलेले असतात , पत्रकारिता व वैयक्तिक संबंध यांचा नाळ बांधण्याचं काम करणारे ग्रामीण भागातील पत्रकार म्हणजे स्वर्गीय पुंडलिकराव घायल हे होत. पत्रकारिता क्षेत्रात येण्या आधी स्व:पुंडलीकराव घायल यांनी आपल्या आयुष्याची काही वर्ष भारत मातेच्या रक्षणासाठी दिली म्हणजे ते सैनिक व एक उत्कृष्ट पत्रकार होते असे पुरुषोत्तम आवारे म्हणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव पिसे निवासी संपादक दैनिक भास्कर अकोला तर उद्घाटक म्हणून पुरुषोत्तम आवारे अध्यक्ष बहुजन पत्रकार संघ विशेष अतिथी म्हणून महेंद्र कवीश्वर ज्येष्ठ पत्रकार, सुधाकर खुमकर सरचिटणीस महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ ,उमेश अलोने ,जिल्हा प्रतिनिधी एबीपी माझा ,कुंदन जाधव जिल्हा प्रतिनिधी न्यूज १८ लोकमत, प्र, सु, ढोकणे अध्यक्ष तालुका पत्रकार संघ तेल्हारा ,सुरेश शिंगणारे ज्येष्ठ पत्रकार तेल्हारा, सत्यशील प्रा सावरकर कार्याध्यक्ष तालुका पत्रकार संघ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अकोला सुभाष रौंदळे, सौ, दीपमाला दामधर, माजी जिल्हा परिषद सदस्य अकोला, संदीप पालीवाल पंचायत समिती सदस्य तेल्हारा, सौ, सपना वाकोडे, ग्रामपंचायत सरपंच दानापूर, उपसरपंच सागर ढगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम स्वर्गीय पुंडलीकराव जी घायल व भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ, एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमा च्या आधी कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सोबतच कोरोना परिस्थितीत जनतेची सेवा करत असताना वीरगती प्राप्त झालेल्या डॉ, पोलीस , सोबतच सद्यस्थितीत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मरण पावलेल्या बांधवांना यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सोबतच मान्यवरांचा येथोचित सत्कार शाल व श्रीफळ देऊन यावेळी करण्यात आला. यावेळी,मान्यवरांच्या हस्ते विनय कुमार घायल यांना भेट वस्तू देण्यात आली.
स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांच्या कार्याचा उहापोह आपल्या मनोगतात मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय हागे, तर सूत्रसंचालन पत्रकार सुनिलकुमार धुरडे, आभार कार्यक्रमाचे आयोजक विनय यांनी व्यक्त केले.

यावेळी तालुक्यातील सर्व दैनिकाचे पत्रकार बांधव , ग्रामपंचायत सदस्य, दानापूर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, स्टडी सर्कल ग्रुपचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन विनय कुमार घायल यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here