शेतात मल्चिंग पेपर चा बंडल मध्ये दळून बसलेला नागाने केला दंश…

रामटेक – राजु कापसे

दि.29/6/2021.गाव नवरगाव तह.रामटेक शेतामध्ये मिरची ची लागवड करण्यासाठी मल्चिंग पेपर लावतात त्या मल्चिंग पेपरचे बंडल खूप दिवसापासून एका झोपडी मध्ये ठेवलेले होते पन पावसाळ्यामध्ये सापाचा बिळामध्ये पाणी सिरल्या मुळे साप आपला स्वरससंरक्षणासाठी चांगल्या ठिकाणची जागा पाहतात पन तिथला एका शेतांत काम करणाऱ्या मजुराने त्या मल्चिंग पेपरच्या बंडला दोन्हीकडून हाताने पकडले त्या मल्चिंग पेपरमध्ये दडून बसलेल्या नागाने स्व रक्षणासाठी चावा घेतला.

घटना रामटेक वरून 5 कि मी अंतरावर नवरगाव जवळ असलेली शेत मालक गिरीश काटेकर रामटेक यांचा शेतामध्ये काम करणारे मजूर कृष्णा भोंडे वय 28 ते ट्रॅक्टर द्वारे शेतामध्ये मल्चिंग पेपर चे बंडल लावत होते बंडल ला हाताने पकडून असल्यामुळे बोटाला काहीतरी चावला व त्यांनी त्या बंडलमध्ये पाहिले बंडल मध्ये पाहताच त्यांना एक साप दिसून आला.

त्यांना खात्री झाली की आपल्या बोटाला साप चावला व त्यांनी आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना साप चावल्याचे सांगितले काही लोकाना सापा कडे लक्ष ठेवनास सागितले व तितला ट्रॅक्टर चालक अजय बादुले व शुभम बादुले नी वेळ न घालवता कृष्णा भोंडे ला रामटेक सरकारी रुग्णालया मध्ये नेले व तितला डॉक्टराला साप चावलाचे सागितले व त्वरित वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्थेचे उपाध्यक्ष राहुल खरकाटे यांना फोनवर घटनेची माहिती दिली व रामटेक सरकारी रुग्णालय मध्ये मदतीसाठी हाक मारली ते बाहेर असल्यामुळे वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे सर्प मित्र प्राणी मित्र अजय मेहरकुळे त्यांना बोलावण्यात आले.

सोबतीला अक्षय घोडाकाडे राहुल गुंडरे सरकारी रुग्णालय जाऊन भेंट दिली व तिथे काही लोक जादू टोन्याचा व जडीबुटी चा विचार करत होते पण त्यांना सर्प मित्र व प्राणी मित्र अजय मेहरकुळे नी समजवनूक काढून सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार करण्या करिता सागितले व तिथून नवरगाव शेतामध्ये जाऊन ट्रॅक्टर ला लागलेले मशीन मल्चिंग पेपरच्या बंडल चा पाईप बाहेर काढनात आले.

त्या मध्ये एक 3 फूट विषारी ब्राऊन कोब्रा (नाग) साप दिसून आला त्या सापाला सुखरूप पकडून एका प्लास्टिकच्या भरणी मध्ये बंद करण्यात आले व त्या सापाला सर्पमित्र अक्षय घोडाकाडे चा स्वाधीन करून फॉरेस्ट मध्ये नेऊन फोरेस्ट अधिकारी अगडे साहेब व वन रक्षक वैभव ऊगले साहेब यांचा समक्ष पंचनामा करून घनदाट जंगलात सोडण्यात आले व पेशंट कृष्णा भोंडे ला नागपूर मे वो हॉस्पिटल ला हालवण्यात आले.

पेशंटला वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्थेचा ॲम्बुलन्स नी नागपुर मो वो रुग्णालय हॉस्पिटल ला ॲडमिट करण्यात आले व पुढिल उपचार सुरु आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती की शेतामध्ये काम करताना काळजीपूर्वक काम करा अशी घटना कुठेही घडली तर कोणतीही मदतीची गरज पडली तर वाईल्ड चैलेंजर ऑर्गनायझेशन संस्थेचा सर्प मित्र प्राणी मित्राला संपर्क साधा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here