अवैध वाळु उपशावर भिगवण मध्ये मोठी कारवाई…एक कोटी दोन लाखाचा मुद्देमाल केला जिलेटीनने नष्ट…

२१ वाळु तस्करांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल,तर १७ वाळु तस्करांना अटक…

भिगवण – उजनीतील वाळु उपशा करुन निसर्गाचे लचके तोडणाऱ्या गावगुंडाच्यावर भिगवण पोलिसांनी कारवाई केली असुन बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उध्द्वस्त करण्याबरोबरच सतरा वाळु तसकरांना अटक केल्याने वाळुवर डल्ला मारुन गल्ला गोळा करणारांचे कंबरडे भिगवण पोलिसांनी मोडल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उजनीतील काळेसोने म्हणुन वाळूची ओळख आहे याच सोन्यावर परिसरातील गावगुंडांची नजर गेल्याने मागील काही वर्षांपासुन महसुल आणि पोलिसांच्या मधील काही कर्मचारी अधिकारी यांना हताशी धरुन उजनीचे लचके तोडण्याचे काम राजरोसपणे चालू होते.

मात्र आज भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाईने वाळु तस्करांना काही काळासाठी जरब बसेल यात शंका नाही वाळूची चोरी काही केल्या थांबत नसल्याने भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जिवन माने यांनी आज केलेली कारवाई कौतुकास्पद आहे अशी चर्चा भिगवण परिसरात रंगु लागली आहे.

आज इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांकडुन अवैद्य वाळू व्यवसायावर मोठी कारवाई करण्यात आली यात २१ वाळुतस्कांवर गुन्हा दाखल केला आहे तर १७ वाळुतस्कर जेलबंद केले आहेत तर चार जण फरार होण्यात यशस्वी झाले अटक केलेले अरोपी परराज्यातील असल्याने हे सर्व कामगार आहेत खऱ्या वाळु तस्करांवर कारवाई होणार का की भिगवण पोलिस कारवाई केल्याचे सोंग करणार हे पाहण औत्सुक्याचे आहे.

भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाळु साठा करण्यासाठी लागणाऱ चार फायबर बोटी व २ हायड्रोलिकच्या वाळु उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या आहेत. तब्बल एक कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जिलेटीन च्या साह्याने उध्वस्त करण्यात आला.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार दत्तात्रेय जाधव ,पोलीस हवालदार इन्कलाब पठाण, पोलीस नाईक समीर करे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

उजनी जलाशयातील वाळू माफियांच्या वरील सर्वात मोठी कारवाई केली असली तरी यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असुन वाळु तस्करीचे साहित्य जप्त करण्यासह वाळु तस्करी करणाऱ्या मालकांच्यावरही गुन्हे दाखल करुन अटक करणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here