कुर्ली गावातील ३१ वर्षीय तरुणाची गळफास लाऊन आत्महत्या…

राहुल मेस्त्री

कुर्ली ता.निपाणी येथील 31वर्षीय तरुणाने गळपास लावुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक 22 रोजी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली.. याबाबत अधिक माहिती अशी की मिलिंद कृष्णात माळी वय वर्ष 31 असे मृत युवकाचे नाव आहे …

मिलिंद गेल्या अनेक दिवसापासून मानसिक तणावाखाली होता. गुरुवार दिनांक 22 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नाही हे पाहून त्याने गळफास लावून आत्महत्या केली.. मिलिंदने अशी अचानक आत्महत्या का केली. याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

ही माहिती समजताच निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आणि सदर मृतदेह निपाणी येथील शासकीय गांधी इस्पितळात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला .त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुली, असा परिवार आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here