Saturday, June 15, 2024
spot_img
HomeMarathi News Todayदक्षिण कोरियाच्या राजधानीत हॅलोवीन उत्सवादरम्यान चेंगराेंगरीत आतापर्यंत १४९ ठार…१५० जखमी…

दक्षिण कोरियाच्या राजधानीत हॅलोवीन उत्सवादरम्यान चेंगराेंगरीत आतापर्यंत १४९ ठार…१५० जखमी…

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथील इटावॉन येथे शनिवारी लोकप्रिय उत्सव हॅलोवीन रात्रीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. हेलोवीनच्या ठिकाणी चित्रपट आणि टीव्ही स्टार्स पाहत असताना जमलेल्या अनियंत्रित गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि भीषण अपघात झाला. हॅलोविन चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 149 वर पोहोचली आहे. त्याचवेळी अन्य 150 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. योनहाप वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. योनहापच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये दोन आणि जखमींमध्ये १५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बळी पडलेले बहुतेक 20 वर्षाखालील लोक आहेत. या अपघाताचा सर्वाधिक फटका या वयोगटातील लोकांना बसला आहे.

सेऊलमध्ये भरलेल्या हॅलोवीन उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाल्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच हॅलोविनला एवढी गर्दी जमली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅलोविन साजरा करण्यासाठी हॅमिल्टन हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटी जमल्याच्या बातम्या येत होत्या. स्टार पाहण्यासाठी गर्दी अरुंद गल्लीत पोहोचली. सेऊल मेट्रोपॉलिटन प्रशासनाने लोकांना त्यांच्या घरी परतण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो
सेऊलच्या योंगसान अग्निशमन विभागाचे प्रमुख चोई सेओंग-बीओम यांनी सांगितले की, उत्सवाला दहा लाखांहून अधिक लोक उपस्थित होते आणि जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. ते म्हणाले की 74 मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, तर उर्वरित मृतदेह रस्त्यावर ठेवण्यात आले आहेत. या घटनेनंतर जखमींवर उपचार करण्यासाठी 400 हून अधिक आपत्कालीन कर्मचारी आणि 140 वाहने रस्त्यावर तैनात करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: