Saturday, June 1, 2024
Homeराज्यगणेश अथर्वशिर्ष या विषयावर सात दिवसांच्या निरूपण मालिकेचे आयोजन ३ मे पासून...

गणेश अथर्वशिर्ष या विषयावर सात दिवसांच्या निरूपण मालिकेचे आयोजन ३ मे पासून…

रामटेक – राजु कापसे

नागपूर: श्री गणेश मंदिर टेकडी, मंदिरात श्री गणपती अथर्वशीर्ष निरूपण मालिका नागपूर नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडी मंदिरात भगवान श्री गणेशांच्या सर्वाधिक लोकप्रीय आणि श्रेष्ठतम भावार्थाने युक्त असणाऱ्या श्री गणेश अथर्वशिर्ष या विषयावर सात दिवसांच्या निरूपण मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुकवार दिनांक 3 मे ते गुरूवार 9 मे 2024 या दरम्यान रोज सायंकाळी 6 ते 7 या वेळात मंदिराच्या महालक्ष्मी सभागृहात गणपत्य तत्वज्ञानाचे अभ्यासक, सुविख्यात लेखक तथा विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद पुंड यांच्या सुमधुर आणि अभ्यासपुर्ण वाणीतून ही निरूपण मालिका साकारणार आहे.

अथर्वशिर्षाचा नेमका अर्थ ? त्यातील प्रत्येक गोष्टीच्या मागे असणारा गूढार्थ, त्यात असणारी अंतरसंगती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या व्यक्तीमत्वाच्या विविधांगी विकासासह, सुख, शांती, समाधानासाठी अथर्वशिर्षाचे असणारे प्रात्याक्षिक महत्व अशा विविध पैलूंना सादर करणाऱ्या या निरूपण मालिकेचा अधिकाधिक गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे श्री गणेश मंदिर टेकडी देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments