Friday, June 14, 2024
spot_img
HomeBreaking NewsChina Earthquake | चीनमध्ये भूकंप...आतापर्यंत १११ लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक...

China Earthquake | चीनमध्ये भूकंप…आतापर्यंत १११ लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक जखमी…पाहा व्हिडिओ…

China Earthquake : चीनमध्ये काल रात्रीच्या सुमारास आलेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 111 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. चीनच्या उत्तर-पश्चिमी प्रांत गांसू आणि किंघाई येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी आहे.

चिनी मीडियाच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे गांसूमध्ये 100 जणांचा मृत्यू झाला आहे, तर किंघाईमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी गांसूमध्ये 96 आणि किंघाईमध्ये 124 जण जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी वर्तवण्यात आली आहे. भूकंपामुळे बरेच नुकसान झाल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाणी आणि वीज व्यवस्था ठप्प झाली आहे. वाहतूक आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मदतकार्य सुरू, बचाव पथक घटनास्थळी सज्ज,

एका सोशल मीडिया पोस्टनुसार, गान्सूची राजधानी लान्झो येथे भूकंपाचे धक्के जाणवताच विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहातून बाहेर आले. तिथे एकच गोंधळ उडाला. बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तंबू, फोल्डिंग बेड आणि रजाई घटनास्थळी पोहोचवली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी मृतांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: