Friday, June 14, 2024
spot_img
Homeसामाजिकरामटेक | नगरधन येथे गुणवंत खेळाडुचा सत्कार समारंभ...

रामटेक | नगरधन येथे गुणवंत खेळाडुचा सत्कार समारंभ…

रामटेक – राजु कापसे

दिनांक ३०/०९/२०२३ रोज शनिवारला रामटेक तालुक्यातील नगरधन येथे श्री उमरावजी मेश्राम महिला व पुरुष तालीम संघ नगरधन तर्फे आयोजित गुणवंत खेळाडूंचे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे उदघाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) श्री. दुधरामजी सव्वालाखे (जि.प. सदस्य नागपुर) यांचे शुभहस्ते करण्यात आले.

व श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या पै. गुजन निलेश दमाहे व विदर्भ महिला केसरी 2022 पै. कल्याणी ओंकार मोहारे या खेळाडूंच्या व तालीम संघातील सर्व उत्कुष्ट खेळाडू व कोच श्री. पै. निलेशजी दमाहे व पै. ईश्वरजी मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने श्री. रमेशजी कारामोरे (जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष), सौ. अस्विता बिरणवार (सदस्या, पं.स. रामटेक), श्री. शंकऱजी होलगिरे (माजी सदस्य, पं.स. रामटेक),

श्री. प्रशांत कामडी (माजी सरपंच नगरधन), सुनील गयगये (उपसरपंच, चिचाळा), धर्मेश भागलकर, सुमित कोठारी, राहुल किरपाण, मितारामजी सव्वालाखे, दिपकजी मोहोड सर, उमेश महाजन, रमेशजी बिरणवार सर, मोहित ईखार, केशव राऊत, चेतन ईखार, अनिल मुटकुरे, भीमराव ठकरेले, गंगा गंगाबोर, रामचंद दमाहे सर, सुभाषजी चव्हाण, प्रशांत लोणारे, ईश्वर बसीने, राजू हारोडे, रुपचंद नागपुरे, मिताराम दमाहे, डॉ. सदाराम गाथे, लक्ष्मण उपराडे, राहुल माहुले, व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: