Thursday, June 13, 2024
spot_img
Homeराज्यसुमारे ९८ किलो गांजासह तिघांना उमदी पोलीसांनी इचगाव टोलनाक्याजवळून घेतलं ताब्यात -...

सुमारे ९८ किलो गांजासह तिघांना उमदी पोलीसांनी इचगाव टोलनाक्याजवळून घेतलं ताब्यात – १६ लाख ६८,८२५ हजारांचा मुद्देमाल जप्त…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्ह्यात होणाऱ्या अवैध गांजा तस्करीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्यानुसार तपास सुरू असतानाच गुप्त बातमीदारांने उमदीमधील अमोघसिद्ध मंदिराजवळ एम.एच 13ए झेड 1379 ही पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर थांबली असून यामध्ये गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी आपल्या टीमसह छापा टाकून गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चाहूल लागतात गाडीत समोर बसलेल्या दोघा इसमानी गाडी भरधाव वेगाने नेऊन तिथून पळ काढला.

परंतु,सदर गाडीतून गांजा घेऊन उतरलेल्या उफतेखारुल हुसेन उर्फ अरबाज बाबासाहेब शेख.वय वर्षे- 26, राहणार- राजू नगर, जुना कुपवाड रोड,सांगली. यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील पोत्या मधून साडेअकरा किलो १लाख ७३,२५०रुपयांचा गांजा जप्त केला. पळून गेलेल्या गाडी विषयी मागवा घेतला असता सदर गाडी ही सोलापूरच्या दिशेने जाऊन ती परत मंगळवेढा मार्गे सांगलीला जाणार असल्याची माहिती मिळताच इचगाव टोल नाक्यावर सापळा रचून सदर वाहनासह त्यामधील दोघात गांजा तस्करांना ताब्यात त्यामध्ये प्रतीक हरिदास कांबळे ,वय वर्ष- 26 ,राहणार -नागराळे, तालुका- पलूस, जिल्हा -सांगली.

आणि मोहसीन मेहबूब गाजगारी वय वर्ष 28 राहणार शंभर फुटी रोड एस आर पाटील समोर सांगली यांचा समावेश आहे त्यांच्याजवळ चौकशी केली असता सदरचा गांजा हा आंध्र प्रदेशातील राजमंद्री मधील प्रकाशभाई यांच्या जवळून खरेदी केला असून तो सांगलीतील पिंटू माळी यांना विकणार असल्याचे सांगण्यात आलं त्यांच्याजवळ सुमारे 98 किलो गांजा, गुन्ह्यात वापरलेली शिफ्ट डिजायर गाडी असा एकूण 16 लाख 67 हजार 825 रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींवर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून,अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण खरात हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, आप्पासाहेब हाके, नितीन पळसकर, महादेव मडसनाळ, मनीषा कुमरे, इंद्रजीत गोदे, सोमनाथ पोटभरे ,अमोल पाटील, सोपान भंडे, वहिदा मुजावर, समीक्षा म्हेत्रे, आदीनी केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: