Saturday, June 1, 2024
Homeराज्यअमृत महोत्सवी सेवानिवृत्त शिक्षकांचा जाहीर सत्कार..! ७५ वर्षांवरील ७५ ज्येष्ठ शिक्षकांचा जाहीर...

अमृत महोत्सवी सेवानिवृत्त शिक्षकांचा जाहीर सत्कार..! ७५ वर्षांवरील ७५ ज्येष्ठ शिक्षकांचा जाहीर सत्कार…

नरखेड – अतुल दंढारे

सती अनुसया माता पावणभूमीचे स्थान असलेले श्री क्षेत्र पारडसिंगा येथील सभागृहात प्रध्याप्पक व सेवानिवृत्त शिक्षक महासभा काटोल यांच्या वतीने 75 वर्षांवरील 75 ज्येष्ठ शिक्षकांचा शाल श्रीफळ व मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून भावूक झाले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल चे सभापती मा चरणसिंगजी ठाकूर यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला.यावेळी त्यांनी पुढील वर्षी हिरक मोह्त्सव करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.दिनेशजी ठाकरे, संचालक तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल, हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ कैलास कडू, माजी शिक्षण सभापती देविदास कठाने ,मधुकरराव दूधकावळे माजी प्राचार्य गुरुस्मुर्ती कनिष्ठ महावद्यालय भिष्णूर किशोर गाढवे,निर्मला कोंडे ,कृष्णराव सावरकर गोरोबा हनवते उपस्थित होते.

या प्रसंगी संघटनेचे जिल्हा शाखेचे नेते साहेबराव ठाकरे,दिपक सावरकर,सरिता किंमतकर,मालती आगरकर,शेषराव घुगल सुर्यकांत वंजारी,शेषराव खंडार,विनोद राऊत,रामदास कीटे, दिपक तिडके,राम ठाकरे ,संजय भेंडे,सुनीता दामले प्रा. सुधीर बुटे ,प्रा.सुनील मोहोड, अजबराव कोल्हे ,जयश्री कावळे सीमा फेंडर, सुरेश पाबळे गजानन भोयर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

सन्मान सोहळ्याआधी जिल्हा कार्यकारिणीची त्रैमासिक बैठक संपन्न झाली. या सभेचे सूत्रसंचालन दीपक सावरकर जिल्हा सरचिटणीस यांनी केले .प्रा. सुनील मोहोड यांची जिल्हा सोशल मीडिया प्रभारी तथा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सन्मान सोहळ्याचे संचालन मांगुळकर सर यांनी केले से.नी शिक्षकांची प्रलंबित प्रश्नाची उत्तरे नामदेव ठोबरे व सुधा राऊत यांनी दिले. प्रास्ताविक अरुण बेंडे व आभार प्रदर्शन मधुकर फरतोडे यांनी केले.प्रास्ताविक तालूका शाखेचे अध्यक्ष अरुण बेंडे व आभार प्रदर्शन तालुका सचीव श्री मधूकर फरतोडे यांनी केले.गजाननराव भोयर उपस्थित होते.सत्काराला उत्तर श्री नामदेवराव ठोंबरे व श्रीमती सुधा राउत यांनी दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश बोरकर ,पुरुषोत्तम सरपे ,गंगाधर मुसळे, सुरेश बाविस्कर भगवान बाविस्कर, प्रेमराज डोगरे,भीमराव मुसळे ,अनिल जयवार ,प्रेमराज डोंगरे, दीप्ती पांडवकर ,रामभाऊ तमाने, अनिल लांजेवार ,वसंत जीवतोडे ,भालचंद्र सुभाष गुरुवे, सुरेश भोसे,जीवन डफरे, नरेंद्र गोळे,संजय वाळके इत्यादी सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments