Thursday, June 6, 2024
spot_img
HomeMarathi News Todayअमरावती | लग्नाचे आमिष दाखवून मुलीची विक्री करणाऱ्या अकोल्याच्या ३ आरोपींना अटक...

अमरावती | लग्नाचे आमिष दाखवून मुलीची विक्री करणाऱ्या अकोल्याच्या ३ आरोपींना अटक…

अमरावती : अकोल्यात परराज्यात मुली विकणाऱ्या टोळींचा धंदा जोरात सुरु असल्याचे या कारवाईवरून सिध्द झाले असून नुकत्याच अमरावती शहरातील एका अल्पवयीन मुलीचे राजस्थानमधील एका व्यक्तीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले ते करून घेऊन त्या विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी संतोष रामधन इंगळे (३४, शिवणी, अकोला), मुकेश ज्ञानदेव राठोड (४०, अकोला), चंदा मुकेश राठोड (३८, अकोला) यांना अटक केली.

शहरातील एका अल्पवयीन मुलीला फसवून आरोपींनी तिला मध्य प्रदेशातील रतलाम शहरात नेले आणि राजस्थानमधील एका व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. ज्याच्या बदल्यात पैसे घेतले. याप्रकरणी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त सागर पाटील यांनी उपाययोजना करून गाडगे नगरच्या डीबी पथकाने टीम इंदूरला रवाना झाली. मात्र याबाबत मुख्य आरोपी सूत्रधारला भेटल्यानंतर तिने तेथून पळ काढला. तिचा प्रियकरही पळून गेला.

मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगरचे पीआय आसाराम चोरमले, डीबी पथकाचे एपीआय इंगोले कर्मचारी खांडे, नीळकंठ गवई, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर यांनी अकोला येथे जाऊन आरोपी संतोषला ताब्यात घेतले. इंगळे, मुकेश राठोड, चंदा राठोड यांना अटक केली. याप्रकरणी पीआय रेखा लोंढे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments