Homeराजकीयश्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची तयारी पूर्ण - चार जानेवारीला ध्वजारोहण होणार...

श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची तयारी पूर्ण – चार जानेवारीला ध्वजारोहण होणार…

Share

सांगली – ज्योती मोरे

श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळा सांगलीतील कल्पद्रुम ग्राऊंडवर 4 जानेवारीपासून सुरू होतोय. 14 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याचा शुभारंभ दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता ध्वजारोहण करून करण्यात येणार आहे. अशी माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली.दरम्यान हा ध्वजारोहण समारंभ श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक परमपूज्य संभाजी भिडे गुरुजी, यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

यावेळी परमपूज्य श्री बजरंग झेंडे महाराज, परमपूज्य श्री गुरुनाथ कोठणीस महाराज, परमपूज्य दीपक नाना केळकर महाराज, परमपूज्य आचार्य श्री तुषारजी भोसले, परमपूज्य श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामी, श्री गणेशराव गाडगीळ, श्रीपाद चितळे, रावसाहेब पाटील, नरेंद्र भाई जानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सदर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून उभारण्यात आलेल्या भव्य शामियान यामध्ये आठ ते दहा हजार भाविक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे तर 4 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी भोजनाची आणि महाप्रसादाची आणि सहा जानेवारीपासून आरोग्य शिबिराचीही सोय करण्यात आली आहे.

यामध्ये सर्व रोग निदान, नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी, रक्तदान, बालरोग तपासणी आदींचा समावेश आहे.दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता राम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमासाठी सांगलीसह जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळा समितीचे कार्याध्यक्ष श्री. मनोहर सारडा यांनी केले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: