हिमाचलमध्ये खासगी बस दरीत कोसळली ९ ठार : उपायुक्तांनी केली मदत जाहीर…

न्युज डेस्क – हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे एका खासगी बस खोल दरीत कोसळून या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी हा अपघात झाला. पोलिसांनी सर्व नऊ मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या अपघातात १० लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हा चंबाचे उपायुक्त यांनी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना तातडीने २०-२० हजार आणि जखमींना पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, चंबाच्या तीसा येथील कॉलनी फोल्डजवळ एक वेदनादायक बस अपघात झाला आहे. खासगी बसमध्ये २०-२५ लोक होते. ही खासगी बस बुंदेडीहून चंबाकडे येत होती यादरम्यान ती मोडवरून खाली घसरली. पोलिस प्रशासन जखमींना काढण्यात व्यस्त आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असून आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अपघाताचे कारण अस्पष्ट – प्राथमिक तपासांअती अपघाताचे कारण कळू शकले नसल्याची माहिती आहे.पण अंदाजे चालकाचे नियत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here