तीबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते ‘दलाई लामा’ यांचा ८५ वा जन्मदिवस…

शरद नागदेवे.

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेत ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धर्मशाला येथे आश्रय घेतला आहे.

जाणून घेऊ इतिहास:

तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरु झाली. ‘दलाई’ म्हणजे महासागर व ‘लामा’ म्हणजे ज्ञान, दलाई लामा या संयुक्त शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे. हे लामा बुद्धिष्ट गुरु किंवा शिक्षक असतात. पहिले लामा जेनडून द्रूप हे ड्रेपुंग विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे.

पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हे पूर्वीच्या लामाचा अवतार मानले जाऊ लागले. सध्या दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. 1391 ते इ.स. 1933 या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरु व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

विशेष कार्य : दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीनं मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.

सन्मान :

दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेवून त्यांना इ.स. 1989 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. देश-विदेशात धर्म, तत्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता, करूणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत आहेत. देश-विदेशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले आहे.

१४ दलाई लामांची नावे- (1) गेंदुन द्रुब, (2) गेंदुन ग्यात्सो, (3) सोनम ग्यात्सो, (4) योंटन ग्यात्सो, (5) न्गावांग लोबसंग ग्यात्सो (6) त्सांग्यांग ग्यात्सो, (7) केल्झंग ग्यात्सो, (8) जामफेल ग्यात्सो (9) लुंगटोक ग्यात्सो, (10) त्सुलट्रिम ग्यात्सो, (11) खेद्रुप ग्यात्सो, (12) ट्रिन्ली ग्यात्सो, (13) थुबटेन ग्यात्सो, (14) तेन्झिन ग्यात्सो .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here