नागपूर जिल्ह्यात ६,९८४ रुग्ण कोरोनामुक्त…७,४९६ नविन कोरोना बाधितांची भर…८९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात आज दि. २९ एप्रिल २०२१ गुरवारी २६,२१२ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली यामध्ये ७,४९६ रूग्ण कोरोनाबाधित आढळले असून शहरातील ४,४२२ व‌ ग्रामीण क्षेत्रातील ३०६७ व बाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ६,९८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील ४,५७६ व ग्रामीण क्षेत्रातील २,४०८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ८९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील ४९ व ग्रामीण क्षेत्रातील ३३ व बाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ७७,६२७ रुग्ण उपचाराधीन असून शहरातील ४६,१५० व ग्रामीण क्षेत्रातील ३१,४७७ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकून रुग्णांची पॉझिटिव्ह संख्या ४,०१३२६ असून जिल्ह्यातील ३,१६,३९९ कोरोनामुक्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here