८ गरजू वंचित कुटुंबांना मिळाला रेशनचा लाभ…रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रयत्नानां यश…

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा-गौरेगांव विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या ग्राम लोधीटोला(धापे.) ता. गोंदिया या गावातील गरजू 8 कुटुंबातील 45 नागरिकांना मा. रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी अन्न सुरक्षा योजना अंतर्गत शासकीय रेशन योजनेचा लाभ मिळवून दिला.

तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील गोंदिया तालुक्यातील ग्राम लोधीटोला(धापे.) या गावातील विविध कुटुंबियांची परिस्थिती हलाकीची असून मागील 2 वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असुन बहुतांश नागरिकांचे रोजगार हिरावून गेल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालनपोषण करणे एक प्रकारे तारेवरची कसरत झालेली आहे. त्यामुळे लोधीटोला येथील वंचित नागरिकांनी रेशन मिळत नसल्याची तक्रार तिरोडा स्थित जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

मा. रविकांत बोपचे यांनी सदर तक्रारींची दखल घेत खासदार मा. प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वात व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात संबंधित अधिकारी व कर्मचारींना गरजू वंचितांच्या परिस्थितीची जाणीव करून देत सदर कुटुंबाना प्राधान्याने शासकीय रेशन योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता सातत्याने प्रयत्न केले व सर्तेशेवटी वंचित 8 कुटुंबाना लाभ मिळवून देण्यात यश प्राप्त झाले व वंचित नागरिकांना अखेर प्राधान्य कुटुंब योजनेतून रेशनचा लाभ मिळाला. याबद्दल संबंधित लाभार्थ्यांनी मा. रविकांत(गुड्डू) बोपचे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here