ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी आत्ता किमान ७ वी पास अनिवार्य; त्या शिवाय ग्रामपंचायतची निवडणूक लढवता येणार नाही…

बिलोली – रत्नाकर जाधव

राज्यात ग्रामपंचायतच्या निवणुक प्रक्रियेस प्रारंभ झाला असून शासनाने सरपंच पदाचे आरक्षणाला स्थगती दिली आहे.सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीत निवडणूक लढवायची असेल तर नवीन नियमानुसार उमेदवार ७ वी पास असणे अनिवार्य असणे आवश्यक असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रघुविरसिंह चौहान यांनी दिली आहे.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आहे.तत्पूर्वी निवडणूक विभागाने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले होते.परंतु निवडणूक जाहीर झाल्या नंतर आरक्षणाला स्थगती दिली आहे.

त्यामुळे प्रमुखाचा हिरमोड झाला आहे.सध्या तालुक्यात ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून सध्या इच्छुकांची कागदपत्र जुळवा जुळव चालू आहे.निवडणूक आयोगाच्या नियमतानुसार २१ वर्षा वरील व्यक्तीस निवडणूक लढवता येणार असून त्या व्यक्तीचे नाव त्या वॉर्डातील मतदार यादीत आहे अशाच व्यक्तीला निवडणूक लढवता येणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकी नंतर सदस्यांमधूनच सरपंच निवडला जाईल असा निर्णय शासनाने घेतला आहे.

आत्ता नवीन नियमानुसार ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर ज्या व्यक्तीचा जन्म १ जानेवारी १९९५ अथवा त्या नंतर झाला असेल आणि जिला या कलम ३ च्या १३ च्या सुधारने नुसार या अधिनियमखाली आत्ता किमान ७ वि पासचे अथवा समतुल्य शैक्षणिक अहर्ता असल्या खेरीज सरपंच म्हणून निवडणूक लढवता येणार नाही,

अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राघूविरसिंह चौहान यांनी दिली आहे.त्यामुळे अशिक्षित उमेदवाराचे सदस्य होण्याचे अथवा ग्रामीण भागातील राजकारण्यांचे सर्व अधिकार आपल्या हातात ठेवण्याचे स्वप्न भंगले आहे.आत्ता ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी ७ वी पास असणे अनिवार्य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here