अकोला जिल्‍ह्यातील ७७ गावांना पुराचा धोका..!

अकोला जिल्ह्यातील पुरामुळे धोक्यात ७७ गावे पहा…

अकाेला – अमोल साबळे

उन्हाचे प्रमाण कमी होत वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाळ्याची Rain चाहुल लागली आहे. पावसाळ्यात वेळप्रसंगी उद्‍भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित ठिकाणी ७७ असून संबंधित गावांना पुराच्या Flood तडाख्याची भीती आहे. त्यादृष्टीने पूरनियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.

अती पावसामुळे जिल्ह्यातील उमा, काटेपूर्णा, शहानुर, मोर्णा, मन, निर्गुणा, आस, वान, गांधारी व मस नद्यांना पूर येताे. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, गुरे पशुधनहानि, सामाजिक जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते.

नदीकाठावरील गावात, वाडी-वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी जाते. तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागते. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर बाधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यावेळी प्रशासन, लोकप्रतिनिधींची धावाधाव होते. पूर ओसरल्यानंतर हा विषय बेदखल केला जातो.

वर्षानुवर्षे अशीच स्थिती आहे. त्यानंतर सुद्धा सरकारी पातळीवरून सकारात्मक कार्यवाही करण्यात येत नाही. प्रत्येक वर्षी नदीकाठच्या गावांना पूराच्या गंभीर धोक्यापासून होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करण्यासाठी ग्रामीण पातळीवर ग्राम आपत्ती निवारण दल स्थापन केले जाते. त्यासाेबतच जिल्हास्तरावर आपत्ती निवारण पथक कार्यान्वित करुन नागरिकांचा बचाव करण्याचे काम केले जाते.

दरम्यान यंदाही जिल्ह्यातील ७७ गावांना पूराचा धोका असून, नदीकाठच्या गावांना ब्लू आणि रेडलाइनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाेबतच इतर गावांनाही पूराच्या दृष्टीकोणातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात पुरामुळे बाधित होणारी ७७ गावे आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यात म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु. व कुरणखेड. बार्शिटाकळी तालुक्यात चिंचखेड, निंभोरा,

तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खुर्द, टाकळी, राजंदा, सुकळी, सिंदखेड, अकोट तालुक्यात केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी, वरूर, तेल्हारा तालुक्यात मनात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळंवद, दानापूर, सौंदळा, वारखेड. बाळापूर तालुक्यात वाडेगाव, बाभूळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा व हातरुण. पातूर तालुक्यात पास्टूल,

भंडारज खुर्द, आगिखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वाहाळा बु., सस्ती व तुलंगा. मूर्तिजापूर तालुक्यात हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापुरा, हिवरा कोरडे, लाखपुरी, माना, खांदला, पोही व उनखेड इत्यादी पूरबाधित गावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here