७५ व्या स्वातंत्र्य वर्ष निमित्ताने महाराष्ट्राची वाटचाल व्यसनमुक्तीच्याच दिशेने होणार – सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे…

मुंबई – धीरज घोलप

आज ०४ आँगस्ट २०२१ रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या कार्याचा आढावा, अनुदान, व्यसनमुक्ती साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण या विषयांसाठी मा.मंत्री महोदय यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत मा, सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे, मा. सचिव, सामाजिक न्याय, मा. आयुक्त, समाजकल्याण विभाग, मा. उपायुक्त, कोकण भवन, समाजकल्याण विभाग, मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, मुंबई शहर व संबंधित विभागाचे अधिकारी व नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष डाँ. राजन वेळुकर, कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, एकनाथ तांबवेकर,

सरचिटणीस वर्षा विद्या विलास, खजिनदार अनिल हेब्बर, चिटणीस मुख्य /संघटक अमोल स. भा. मडामे, संघटक प्रतिनिधी बिस्मिल्ला सय्यद शब्बीर सदस्य डॉ. प्रभा तीरमरे, प्रिया पाटील हे उपस्थित होते.डाँ. राजन वेळुकर यांनी देशाच्या विकासांत घडणाऱ्या घडामोडींमध्ये व्यसनांमुळे घडणारी कृत्ये, गुन्हे हे लक्षात घेता यांत असणारा तरुणांचा सहभाग हा प्रकर्षाने जाणवतो.

त्याच्या निर्मुलनासाठी प्रचार, प्रसार, प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यरत राहणे गरजेचे असुन याचे स्वरुप व्यापकतेने वाढविणे गरजेचे असुन त्याकरिता अनुदान वाढ करुन जोमाने कार्य करण्यासाठी उद्युक्त करावे असे मत मांडले.प्रा. प्रभा तिरमारे यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रात समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून कार्यरत असताना लहान वयांतच मुलांची व्यसनाकडे चाललेली वाटचाल शारिरीक संबंधांपर्यंत घेऊन जात असल्यामुळे तळागाळांपर्यंत प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मांडले.

उपस्थितांचे मनोगता नंतर मा. मंत्री महोदय यांनी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेचे थकीत अनुदान तातडीने देण्याचे संबंधित अधिकारी यांना आदेश दिले तसेच अनुदान वाढ तसेच व्यसनमुक्ती साहित्य संमेलन व पुरस्कार या विषयांच्या पुर्तीसाठी आवश्यक निधीची पुर्तता करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना देऊन या विषयांत कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले.

महाराष्ट्राच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्ताने व्यसनमुक्ती धोरणाच्या अमलबजावणीने महाराष्ट्र शासन व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करित असुन व्यसनमुक्त युवा पिढी निर्माण करणे हे धेय्य प्राप्तीसाठी कार्यरत असणार असल्याचे प्रकर्षाने मांडले.

सामजिक न्याय विभाग प्रधान सचिव यांनी व्यसनमुक्ती चे काम महाराष्ट्रात वाढवणे गरजेचे आहे आणि शासन अनुदानाची प्रक्रिया सुलभ करेल असे आश्वासन दिले.व्यसनमुक्तीच्या दिशेने सदर बैठक पार पाडल्याबद्दल सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी विशेष मा.मंत्री महोदय चे आणि सर्वांचे आभार व्यक्त केले. सदर बैठकीचे संचालन नशाबंदी मंडळाचे चिटणीस व मुख्य संघटक अमोल मडामे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here