७५ वा स्वातंत्र्य दिन देवलापार येथील अप्पर तहसील कार्यालयात ध्वजारोहण करून उत्साहात साजरा…

कोरोना योद्ध्यांचा अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे यांच्या हस्ते सन्मान…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

देवलापार येथील अप्पर तहसील कार्यालयात ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील झेंडावंदन अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गावातील गुरुकुल आश्रम शाळा, उदय विद्यालय व स्वामी विवेकानंद विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृतीचे काम करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी, आशा वर्कर व पत्रकार बांधवांचा प्रशस्तीपत्र देऊन अपर तहसीलदार प्रेमकुमार आडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमातला प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड देवलापारच्या सरपंच शाहिस्ता पठाण, मंडळ अधिकारी अमोल पोद्दार, पत्रकार, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here