वान धरणात ७५.५३ टक्के जलसाठा…

ashwin khadse photography

दानापूर – गोपाल विरघट

समस्त अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्याऱ्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात सद्यास्थितीत ४०७.४२ जलाशय पातळी व ६१.९० उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती सबंधित वान धरण अधिकारी यांनी दिली.

कासवगतीने भरणाऱ्या वान धरणात दर दिड तासांनी १ से.मी. ने वाढ होत आहे,यावेळी अमरावती जिल्ह्यात कमी झालेले पर्जन्यमान याच मुख्य कारणामुळे धरणात सुरुवातीपासूनच पाण्याचा साठा कमी प्रमाणात होत आला. यावर्षी या धरणाचे गेट उघडे करण्याची आशा काहीशी कमी आहे,

हीच परिस्थिती राहली तर वान धरण हे १०० टक्के भरणार की नाही याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. या धरणावर अनेक गावांची तहाण अवलंबून आहे.आता परतीच्या पावसावरच सगळी आशा कायम असुन यावर्षी शेतकऱ्यांच्या नशिबी या धरणातील पाणी आहे का? हे येणाऱ्या काळातच समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here