बिबट्याने केली ७ बकऱ्याची शिकार; रामटेक शहरात भीतीचे वातावरण…

रामटेक – राजू कापसे

रामटेक शहरात आज अचानक सगळ्या लोकांना एक चांगलाच धक्का दिला की बिबट्याने थेट शहरात येऊन एका घरी बांधलेल्या ९ बकऱ्या पैकी ७ बकऱ्या ची शिकार केली त्यामुले रामटेक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुष्पा गणपत भोपळे रा महात्मा फुले वार्ड या ठिकाणी राहतात .त्यांच्या बकऱ्याच्या व्यवसाय आहे.

त्या नेहमी प्रमाणे आपल्या बकऱ्या सकाळी चारा वगैरे नंतर सायंकाळी आपल्या घरातील गोठ्यामध्ये बांधून ठेवतात. त्यांच्याकडे ९ बकऱ्या असून काल दि २१ आक्टो ला रात्री च्या सुमारास बिबट्या हा त्यांच्या गोठात शिरला व त्यात त्यांनी ७ बकऱ्या वर आपला डाव चडविला व २ बकऱ्या आपलं जीव कसा बिसा वाचविला. सकाळी उठल्यावर पुष्पा यांनी आपल्या बकऱ्या पहासाठी गेल्या तर त्यांच्यासमोर बकऱ्या मेलेल्या अवस्थेत दिसल्यास त्यांनी आरडा ओरड करीत लोकांना या बाबत सांगितलं.

तशीच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व लोकांची पाहायला रंगाच रांग लागली होती.यात त्यांचं ५० ते ६० हजार रु चा नुकसान झाल असून वन अधिकारी रामटेक यांना लगेचच माहिती मिळाली व त्यांनी घटना स्थळ दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला असून बकऱ्या वन कर्मचारी यांनी आपल्या तब्यात घेतल्या व त्यांचा दफन विधी केली.

गेल्या अनेकदिवसापासून रामटेक गडमंदिर,अंबाला परिसरात बिबट्याने धुमाकाळ घातलेला आहे. एक दिवसाअगोदर बिबटट्याने नवरगाव परिसरात शिकार केली होती.
नागरिकांनी व लहान मुलांनी रात्रीच्या वेळेस बाहेर पडतांनी जाणीव पूर्वक घरातून काळजी घेऊन बाहेर पडावे जेणे करून कोणतीही घटना घडू नये असे आव्हान वन क्षेत्र सहायक गोमासे यांनी केले आहे.

गायकवाड मुख्याधिकारी न प रामटेक आज रामटेक शहरात बिबट्याने बकऱ्याची शिकार केली मी नागिरीकांना नम्रविनंती करतो की लोकांनी रात्रीच्या वेळेस बाहेर जाणीव पूर्वक पडावे व आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. व आपले पालतू जनावरे आपल्या घरी बांधावे .व रामटेक गडमंदिर येथे काकड आरती आजपासून सुरु होत आहे त्यामुळे नागरिकाणी पायी न जावे व आपल्या वाहनाने जावे.

आम्ही न. पा. तर्फे आज रामटेक शहरात याबाबत दावंडी पण फिरवली आहे. मुख्याधिकारी गायकवाड रामटेक गेल्या अनेकदिवसापासून रामटेक गडमंदिर,अंबाला परिसरात बिबट्याने धुमाकाळ घातलेला आहे.एक दिवसाअगोदर बिबट ने नवरगाव परिसरात बिबट ने शिकार केली होती.रामटेक शहरात बिबटयाने केलेल्या आंतकामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत व नुकसान ग्रस्त महिलेला नुकसान भरपाई देण्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी रामटेक व मा .वनक्षेत्र अधिकारी रामटेक यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here