अहेरी पोलिसांच्या मोठया कार्यवाहीत ६५ गोवंशाला जीवनदान…

तीन ट्रक पोलिसांच्या ताब्यात.
बजरंग दलाचा सहभाग.

अहेरी – मिलींद खोंड

आष्टी अहेरी महामार्ग वर दीना नदी ते सुभाष ग्राम च्या मध्यात पोलीस कार्यवाहीत 65 गोवंशाची 3 ट्रक मधून सुटका करून कत्तली साठी जाणाऱ्या गोवंशाना दिला जीवनदान रात्रीच्यावेळी बोरी येथे गस्ती वर असताना 3 ते 3,30 च्या दरम्यान पोलिसांना तीन ट्रक तेलंगाणा पासींग चे 2 गाडी न ,T S 12 UC 9336,

व TS12 US 8749 महाराष्ट्र पासींग MH40 न 3317 चा 1आष्टी वरून अहेरी कडे येत असताना त्यांना पोलिसांनी हात दाखवून थांबवण्यास सांगितले तर ते तिन्ही ट्रक गाडी न थांबवीता आणखी स्पीड वाढवून पडून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून गाडी थांबविले असता,

अंधाराचा फायदा घेऊन तीनही गाडी चे ड्रायव्हर पडून जाण्यास यशस्वी झाले पण गाडीत झोपलेले दोन क्लिनर पोलिसांच्या हातात सापडले व गाडी मध्ये चेक केल्या असल्यास त्याचात गोवंश हातपाय बांधून कोंबून भरूनअसल्याचे तीनही गाडीत दिसून आले मदतीसाठी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकरताना फोन केला.

तेव्हा जिल्हा सहसंयोजक देवेंद्र खतवार विनोद जिलेला अनिल गुरनुले पवन दोंतुलवार व इतर कार्यकर्ता घटनास्थळी पोहचले ड्राईव्ह पळून गेल्याने पोलिसांनी ड्राईव्हर ची वेवस्था केली घटनास्थळच्या जवळच्या बोरी येथे 22 व रायपूर पॅचयेथे 47 कांजीमध्ये गोवंश उतरविण्यात आले त्या पैकी 4 जनावरे मृत्युमुखी पडले होते जिवंत उतरवलेल्या गोवंशामध्ये आणखी काही जनावरांची नाजूक स्थिती आहे तीनही ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांची चोकशी सुरू असून त्यातील दोन इसमावर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 अनव्ये भा. द. वि.गुन्हा दाखल करण्यात आले आहे.अधिक तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवाणी,उपविभागीय पोलीस अधीक्षक बजरंग देसाई, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक दळसपाटील अहेरी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here