यवतमाळ जिल्ह्यात ५२ नव्याने पॉझेटिव्ह; २८ जण बरे एकाचा मृत्यु…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ गत 24 तासात जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये घाटंजी शहरातील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 28 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 711 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 659 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 469 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11382 झाली आहे.

24 तासात 28 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10543 आहे. तर जिल्ह्यात एकूण 370 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 110149 नमुने पाठविले असून यापैकी 109333 प्राप्त तर 816 अप्राप्त आहेत. तसेच 97951 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here