अकोल्यात ५० वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या…परिसरात खळबळ…

फोटो -सौजन्य गुगल

अकोला – शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वन विभागाच्या कार्यालयाजवळ एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढल्याने खळबळ उडाली आहे. त्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आसिफ पठाण असून त्याची दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

शहरातल्या भागवाडी येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय आसिफ पठाण हा रिक्षा चालक असल्याची माहिती मिळाली असून त्याची आपसी वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. पण काही वैयक्तिक वाद होते का, आरोपी आणि मृत यांचं काही कनेक्शन होतं का?, नेमकी कोणत्या कारणाने ही हत्या केलीय? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रामदास पेठ पोलीस, सिटी कोतवाली पोलीस, SDO ,LCB पोलीस तर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास रामदासपेठ पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here