आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नाने रामटेक येथे ५० बेडचे कोविड केयर सेंटर तयार…

स्वामी सिताराम महाराज हॉस्पिटल व किमया हॉस्पिटल येथे अतिरिक्त अनुक्रमे २५ व २० बेड

उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे ऑक्सिजन पुरवठ्यासह अतिरिक्त १० बेडची तयारी

रामटेक – राजु कापसे

सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून याचे पडसाद शहराह ग्रामीण भागातही सर्वत्र दिसून येत आहे. रामटेक तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रामटेक येथे आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे नगर परिषद सुतिकागृह येथे ५० बेडचे कोविड केयर सेंटर तयार झाले असून लवकरच ते रुग्णाकरिता उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर रामटेक येथील स्वामी सिताराम महाराज हॉस्पिटलला २५ बेड व किमया हॉस्पिटल येथे २० बेड डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कडून मंजुरी मिळवून घेतली. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.

उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे कोरोना रुग्णाकरिता ऑक्सिजन पुरवठ्यासह आधी १० बेड उपलब्ध होते. त्यानंतर अतिरिक्त १० बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती रामटेकचे आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी दिले आहे.

आज दि. ११ एप्रिल रविवार रोजी सकाळी अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथील रुग्णालयाची पाहणी केली व आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार मस्के, वैधकीय अधिक्षक डॉ. उजगिरे सोबत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here