कोसमी-किसनेली जंगल परिसरात ५ नक्षल ठार…

गडचिरोली – उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात मा.पोलीस अधीक्षक श्री.अंकित गोयल सर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्री.मनीष कलवानिया सो व पोलीस उपअधीक्षक श्री.भाऊसाहेब ढोले सो यांच्या नेतृत्वाखाली सी ६० चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.

प्रत्युत्तरादाखल सी ६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.यामध्ये ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० जवानांना यश आले.घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here