राष्ट्रीय महामार्गावर दरोडा घालणारे ५ आरोपीतांना २ तासाचे आत अटक करुन २२ लाख २३ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त…

गोंदिया – अमरदिप बडगे

दिनांक १४/०९/२०२१ चे दुपारी १२.०० फिर्यादी नामे मो. इरशाद मो. फारुख कुरेशी वय २८ वर्ष रा. शिवनी म.प्र. हा ट्रक क्रमांक एम एच ४० – बी.जी.-६६१७ वाहनाने त्याचे दोन मजुरासह नागपुर येथुन बोरी जि. गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वरुन जात असतांना सांयकाळी १६.०० वा. सुमारास देवरी येथे मिलन ढाब्याजवळ एक पांढ-या रंगाची टाटा कंपनीची झेस्टा चारचाकी वाहन क्रमांक सी.जी. ०७ बि.के. ५१८० ही ट्रकच्या जवळ येऊन त्यातील इसमांनी गाडी थाबविन्याचा इशारा केल्याने फिर्यादी याने ट्रक थांबविला असता सदर वाहनातील १ इसम हा ट्रकमध्ये चढुन त्यांने ट्रकची चाबी काढुन फिर्यादी यास खाली उतरविले.

फिर्यादी याने सदर इसमास आपण कोण आहात व माझी गाडी का थांबविले असे विचारले असता आम्ही गाडी सिझ करनेवाले आहोत असे सांगितले. परंतु गाडीचे फायनंन्स इंस्टॉलमेंट दिनांक ०५/०९/२०२१ ला भरलेले असल्याने फिर्यादी यास त्यावर संशय आल्याने ट्रक मालकाचे मुलास फोन लावीत असता सदर इसमाने फिर्यादीचे मोबाईल हिसकावुन मारपिट केले व त्याचेसोबत असलेले साथीदारांनी ट्रकमध्ये असलेले दोन मजुराचेकडे असलेले मोबाईल हिसकावुन आपले जवळ ठेवले.

त्यानंतर त्यापैकी एका इसमाने ट्रक आपल्या ताब्यात घेऊन मजुरासह छत्तीसगड चे दिशेने निघाले व फिर्यादी यास आरोपीतांनी त्यांचेकडील असलेले झेस्टा गाडीमध्ये बसवुन ट्रक सोबत निघाले. ट्रक मालक याने फिर्यादी ट्रक चालक यास फोन लावले असता तो फोन उचलत नसल्याने व नंतर चालक व दोन्ही मजुराचे फोन बंद झाल्याने त्यांना संशय आल्याने त्याबाबत त्याचा देवरी येथे राहणारा भाऊ नियाज कुरेशी यास सांगितले, त्यंनी सदर बाब ही देवरी पोलीसांना कळविले.

सदरची माहीती प्राप्त होताच देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री सिंगनजुडे यांनी सदर घटनेबाबत पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री विश्व पानसरे यांनी माहीती दिली व पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता तात्काळ पोलीस स्टॉपसह सदर ट्रकचा शोध घेणे कामी छत्तीसगड कडे रवाना झाले असता छत्तीसगड मधील चिचोला गावाच्या पुढे त्यांना नमुद क्रमांकाचा ट्रक पळुन जातांना दिसला असता त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो ट्रक न थांबविता समोर छत्तीसगड कडे पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होता.

ट्रक सोबत जात असलेले टाटा झेस्टा वाहनाचा सुध्दा संशय आल्याने ट्रक व झेस्टा वाहन यांना मोठया सिताफीने थांबवुन जवळच्या ढाब्यावर घेऊन गेले. त्यांनतर पोलीस स्टेशन चिचोला , येथील ठाणेदारांना माहीती देऊन स्थानिक पोलीसांचे मदतीने ट्रक व झेस्टा वाहन व त्यातील इसम व आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ट्रक व झेस्टा वाहन व त्यातील इसम यांना पो.स्टे. देवरी येथे आणण्यात आले व फिर्यादी नामे मो. इरशाद मो. फारुख कुरेशी वय २८ वर्ष रा. शिवनी म.प्र.यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन देवरी येथे दिनांक १५/०९/२०२१ रोजी गुन्हा रजि. क्रमांक २२७/२०२१ कलम ३९५, ३६५ भादंवि अन्वये नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि नरेश उरकुडे, पो.स्टे. देवरी हे करीत आहेत.

सदर गुन्यातील आरोपी क्र १) शुभम सोनकर वय २९ वर्ष २) विशाल कुशवाह वय २२ वर्ष ३) रोशन सिंग वय २५ वर्ष ४) करण सिंग वय २५ वर्ष ५) लुकेश सिंग वय २४ वर्ष सर्व राहणार भिलाई यांना दिनांक १५/०९/२०२१ चे सकाळी ०६.१२ वा. अटक करण्यात आले असुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरी गेलेला ट्रक क्रमांक एम एच ४० बी.जी.-६६१७, मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेले टाटा झेस्टा वाहन क्रमांक सी.जी. ०७ – बि.के. ५१८० असा एकुण किमती २२,२३,०००/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री विश्व पानसरे, अपर गेलीस अधिक्षक श्री अशोक बनकर, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रेवचंद सिंगनजुडे, पो.स्टे. देवरी, पोउपनि नरेश उरकुडे पोशि हातझाडे, पोशि जांगडे, पो.स्टे. देवरी यांनी केली असुन पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे यांनी सदर कार्यवाही मध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here