कोगनोळीत ३९ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या!..

प्रतिनिधी ; राहुल मेस्त्री…
कोगनोळी, ता.निपाणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून परिचित असलेल्या बीएसएनएल आँफिस लगतच एकाने गळफासाने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवार दि.18 रोजी सकाळी उघडकीस आला.याबाबत अधिक माहिती अशी की सचिन अशोक दावाडे पाटील वय वर्ष 39 रा.कोगनोळी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

तर घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन पाटील हा बीएसएनएल आँफिसमध्ये खाजगी स्वरूपात कर्मचारी होता. या आत्महत्या पाठीमागील कारण स्पष्ट झालेले नसून त्याने बीएसएनएल आँफिस जवळ असणाऱ्या टॉवरला दोरीच्या साह्याने गळफासाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार, सहाय्यक उपनिरीक्षक एस ए टोलगी, अमर चंदनशिव, राजू गोरखनावर, विजय सावळोजी यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी बघ्याची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here