लघुळ येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आधार लिंक करण्यास ग्रामसेवकांची टाळाटाळ ३८० लाभार्थी लिंकपासून वंचित…

बिलोली – रत्नाकर जाधव

तालुक्यातील मौ.लघुळ येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आधार लिंक करण्यास ग्रामसेविका सौ.यांनावार यांनी जाणीवपुर्वक निष्काळजी केल्यामुळे ३८० लाभार्थी यापासून वंचित राहीले आहेत असा आरोप करत वंचित लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करून घ्यावे व ग्रामसेविकेनी लिंक कामी निष्काळजी केल्यामुळे याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

बिलोली तालुक्यातील मौ.लघुळ येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ४८४ लाभार्थ्यांनी अर्ज भरले होते.ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यात त्यांनी कुटूंबातील सर्वांचेच आधारलिंक करणे अनिवार्य आहे असा शासनाचा नियम आहे.

यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या ऑपरेटर द्वारे सर्व लाभार्थ्यांच्या कुटूंबातील आधार लिंक करून घेणे गरजेचे होते.आणि यासाठी ३१ ऑगस्ट शेवटची तारीख होती.परंतु लघुळ येथील ग्रामसेविका सौ.यांनावार यांनी जाणीवपूर्वक या बाबतीत दुर्लक्ष केले.

या बाबतीत लाभार्थ्यांना माहिती दिली नाही.या लाभार्थ्यांच्या बहुतांश लाभार्थी अशिक्षित असल्यामुळे शेवटची तारीख कधी आहे आणि आधारलिंक कशी करावी याबाबतीत अनभिज्ञ होते.तर कांही लाभार्थ्यांना शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याची माहिती असल्यामुळे जवळपास १०४ लाभार्थ्याणी बाहेरून आधार लिंक करून घेतले.परंतु उर्वरित ३८० लाभार्थी मात्र या पासून वंचित राहिले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज दिल्यानंतर ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या ऑपरेटर द्वारे सर्व लाभार्थ्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे आधारलिंक करून घेणार असल्याचे सांगत ग्रामसेविका सौ.यांनावार यांनी लाभार्थ्यांची दिशाभूल केली आहे.

त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालून ग्रामसेविकेनी केलेल्या चुकांची चौकशी करून लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित न ठेवता त्यांना या योजनेत समाविष्ट करून घ्यावे अशी विनंती माजी उपसरपंच दत्तात्रय दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here