पातूर तालुक्यातील तांदळी येथे ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले…

निशांत गवई,पातुर

पातूर : तालुक्यातील ग्राम तांदळी येथे आज 35 कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे तांदळी येथे एकच खडबड उडाली आहे सविस्तर वृत्त असे कि काही दिवसा पूर्वी तांदळी येथे एक रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन तांदळी येथे 3 सप्टेंबर रोजी स्वाब तपासनि मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेला तहसीलदार दीपक बाजड तालुका वैद्यकीय अधिकारी विजय जाधव बाभूळगाव प्रथमिक आरोग्य केंद्र चे डॉक्टर प्रफुल्लचंद्र शिरसाट तलाठी दीपक देशमुख यांच्या उपस्थितीत एकूण 78नागरिकांचि तपासणी करण्यात आली होती.

या तपासणी मध्ये एकूण 35 नागरिकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्या चे आढळून येताच आज तांदळी येथे काही परिसर कंटेनमेट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून बाभूळगाव येथील प्राथ. आरोग्य केंद्राचे डॉक्टर प्रफुल्लचंद्र शिरसाठ व आरोग्य विभाग चि चमू यांनी तपासणी दरम्यान परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here