Wednesday, February 21, 2024
Homeराज्यरामटेक | ३२ वर्षीय महिलेचा जळून मृत्यू..!

रामटेक | ३२ वर्षीय महिलेचा जळून मृत्यू..!

Share

रामटेक – राजु कापसे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याहद्दीतील अंबाळा येथील रहिवासी एका 32 वर्षीय गृहिणीची जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.ही घटना दि.5 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

रामटेक जवळील अंबाळा येथील रहिवासी सौ.रेश्मा किशोर आकुलवार वय 32 वर्ष.यांना स्वतःच्याच घरात अचानक आग लागली. घराशेजारील लोकांनी तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल केले.मात्र जास्त प्रमाणात शरीर जळल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले.मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सदर घटना ही आत्महत्या आहे की हत्या याची शहानिशा होणे शिल्लक आहे.सदर घटनेचा तपास रामटेक पोलीस करीत असून पोलीस स्टेशन रामटेक येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: