भिवंडीमध्ये ३ मजली इमारत कोसळली…८ जण ठार…अनेक नागरिक अडकल्याची भीती…

न्यूज डेस्क – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात रविवारी रात्री उशिरा तीन मजली इमारत पट्ट्यासारखी कोसळली.इमारतीच्या मलब्याखाली दबून ८ जणांचा मृत्यू तर इमारतीत राहणारे बरेच जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८४ मध्ये बांधलेल्या जिलानी अपार्टमेंट नावाच्या इमारतीच्या अर्ध्या इमारती रात्री उशिरा कोसळल्या.

ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नागरिक झोपेत असताना अचानक आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भिवंडीच्या पटेल कंपाऊंडमध्ये गोंधळ उडाला. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह इमारतीच्या ढिगारावरून काढले गेले आहेत.

अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी येथे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली, असे एनडीआरएफने सांगितले. स्थानिक लोकांनी ढिगार्याखालून २० जणांची सुटका केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरआरसी मुंबईची एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे.

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे :

१) मोबिन शेख( पु/४५वर्ष)
२) हैदर सलमानी( पु/२०वर्ष)
३) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
४) मोहम्मद अली(६०/वर्ष)
५) शबीर खुरेशी(३०/वर्ष)

मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे

१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२) फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३) आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४) बब्बू(पु/२७वर्ष) इतर मृतांची नावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here