Chikhaldara News | एकाच झाडावर आढळले ३ विषारी कोब्रा…मेळघाटातील घनदाट जंगलातील दृश्य…

न्युज डेस्क – मेळघाटातील जंगलातील एका झाडावर ३ कोब्रा साप एकाचवेळी दिसून आले. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मेळघाटात अनेक वन्य पशू आणि पक्षी दिसतात. त्यासाठी अनेक पर्यटक या भागातील जंगलात भ्रमंती करीत असतात. अशाच एका भटकंती करणाऱ्या गटाला मेळघाटच्या जंगलात अचानक कोब्रा दिसला.

त्याच्याशेजारी आणखी एक कोब्रा होता. बाजूलाही एक कोब्रा होता. एकाचवेळी एकाच झाडावर ३ कोब्रा असल्याचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. काळा कोब्रा दिसणे ही दुर्मीळ बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तसे जंगल म्हटले की जंगली प्राणी, पक्षी, साप दिसणारच. परंतु, एकाच झाडावर एकाचवेळी तीन-तीन कोब्रा दिसणे हे खरच दुर्मीळ आहे. या आधी अनेक साप आम्ही पाहिले मात्र, अशाप्रकारचे दृश्य हे खरेच आश्चर्यकारक होते असे स्थानिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here