कारची दुचाकीला धडक…दुचाकीवरील ३ जण जागीच ठार…मोर्शी चांदूरबाजार रोडवरील मधापुरी जवळील घटना…

प्रज्योत पहाडे अमरावती

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी चांदूरबाजार रोडवरील मधापुरी जवळील हनुमान मंदिराजवळ कारची व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार असलेल्या तिघांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला आहे.

चिमाजी काकरे, शुभाजी इनवाते, व इतर असे मृतकांचे नाव आहे. कारची दुचाकीला जबर धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच मोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.अपघातात ठार झालेले मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी मोर्शी येथे पाठविले आहेत.

तर कार चालक मोहन तहाड याला पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करताहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here