विज पडुन ३ शेतमजुरांचा मृत्यु, चोरखुमारी शिवारातील घटना, दोघे सुदैवाने बचावले…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील तथा देवलापार पो.स्टे. अंतर्गत येत असलेल्या चोरखुमारी शिवारात विज पडल्याने ३ शेतमजुरांचा जागीच मृत्यु झाला. घटना आज दि. ६ जुलै दुपारी ३.१५ वाजतादरम्यानची असुन या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

दिलीप मंगल लांजेवार (४६) रा. डोंगरी, मधुकर पंधराम (५२) रा. चोरखुमारी व योगेश अशोक कोकण (२७) रा. चोरखुमारी अशी मृतकांची नावे असुन यापैकी योगेश अशोक कोकण हा अविवाहीत होता. प्राप्त माहितीनुसार डोंगरी ते चोरखुमारी शिवारात माजी पं.स. सदस्य हरीसींग सोरते यांची शेती आहे. सध्या शेतकऱ्यांचे शेती चे कामे सुरु असल्याने सोरते यांचेही शेतात कल्टीव्हेटर चे काम सुरु होते.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास या परीसरात पाऊस सुरु होता. यावेळी शेतमालक हरीसिंग सोरते हे शेतातीलच झोपडीमध्ये बसले होते. तथा भिवा सोरते नामक व्यक्ती काही कामानिमित्य नुकतेच शेताबाहेर गेलेले होते.

याचदरम्यान दुपारी ३.१५ वाजता दरम्यान दिलीप मंगल लांजेवार, मधुकर पंधराम व योगेश अशोक कोकण हे शेतात कल्टीव्हेटर चे काम करीत असतांना शेतामध्ये विज पडली असता यात वरील तिनही शेतमजुरांचा जागीच मृत्यु झाला. यावेळी झोपडीत बसलेले हरीसिंग सोरते व कामानिमीत्य शेताबाहेर गेलेले भिवा सोरते हे सुदैवाने बचावले. मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here