किट्स मधे ३ दिवसीय अध्यापन विकास परिषदेचे आयोजन संपन्न…

रामटेक – राजू कापसे

कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (किट्स) रामटेक येथे आयकुएसी  अंतर्गत १० ते १२ फेब्रुवारी पर्यन्त ३ दिवसीय ऑनलाईन व ऑफलाईन  पद्धतीने अध्यापन विकास परिषदेचे यशस्वी आयोजन  कालिदास सेमिनार हाल मधे सम्पन्न झाले.  कार्यक्रम   आर्किटेक्चर विभागतर्फे “रोल  ऑफ आर्किटेक्टस अँड इंजीनियर्स इन प्रोफेशनल एडिफिकेशन” ह्या विषयवार आयोजित केले होते.   

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव यांचे हस्ते आभासी पद्धतीने झाले. निरोप समारंभ डॉ. रविन्द्र बोपचे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी प्रामुख्याने संस्थेचे कार्यकारी निदेशक व्ही. प्रणव, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, समन्यक प्रा. कल्पना ठाकरे   सहित सहभागी उपस्थित होते. 

रामटेक येथील किट्स अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत आर्किटेक्चर विभागाद्वारे “रोल  ऑफ आर्किटेक्टस अँड इंजीनियर्स इन प्रोफेशनल एडिफिकेशन”  विषयी तीन दिवसीय अध्यापन विकास परिषदेचे  ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने  प्राध्यापकांच्या मार्गदर्शनासाठी आयोजन करण्यात आले.  

 परिषद  मधे महाविद्यालयातील विविध शाखेच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये २१  प्राध्यापक सहभागी झाले. १२ तज्ञ प्राध्यापकांनी  विविध विषयावर मार्गदर्शन केले. 

संस्था सचिव  व्ही. श्रीनिवासराव म्हणाले की परिषद आयोजित केल्याने प्राध्यापकांना चांगले मार्गदर्शन मिळेल. असे कार्यक्रम नियमित आयोजित करावे. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की शिक्षक विद्यार्थी असतो. नवीन नवीन ज्ञान आत्मसात करावे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. कल्पना ठाकरे  यांनी केले. त्या म्हणाल्या की वर्षभरात आर्किटेक्चर विभागांनी ४   गेस्ट लेक्चर,  २ वर्कशाप तसेच विविध कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी  आयोजित केले. त्यांच्या लाभ विद्यार्थ्यांना होईल.

 प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे,  डॉ. ए. एन. दाभाडे. डॉ. एस. पी. चिंचोळकर डॉ. पी. एस. आष्टनकर, डॉ. व्ही. पी. महात्मे, प्रा. भूषण देशपांडे, डॉ. सतीश भेले, डॉ. एम. बी. मावळे डॉ. रविन्द्र बोपचे, प्रा. अंजली नरड, प्रा. शिवप्रसाद यानी  मार्गदर्शन केले. प्रा. अंजली नरड यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here