धक्कादायक – मासिक पाळी चेक करण्यासाठी तब्बल ६८ विद्यार्थिनींना काढायला लावली अंतर्वस्त्रे…

डेस्क न्यूज – गुजरातच्या भुजमध्ये एक अतिशय लाजीरवाणी बातमी समोर आली आहे. मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी एका कॉलेजने ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरात येथील भूजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवली आहेत. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासले. या पकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे.गुजरातमधील स्थानिक माध्यम संस्थेत प्रसिद्ध झाल्यानंतर ही बातमी उघडकीस आली आहे. या मीडिया संस्थेच्या अहवालानुसार, महाविद्यालयात मुलींना इतरत्रही हात मिळविण्याची किंवा विद्यार्थ्यांना मिठी मारण्यास परवानगी नाही.

 

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.