झिलबोडी जिल्हा परिषद शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जन्मदिवस साजरा…पाल्यांकडुन शिक्षकांचे कौतुक……

अमरदीप लोखंडे.14/02/20
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची संकल्पना या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ललीता पिसे व साहाय्य शिक्षक राउत सर हे दोन्ही शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांचे जन्मदिवस साजरा करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात. चिमुकल्या विद्यार्थ्यांवर शौक्षणिक संस्कार बरोबरच त्यांच्या आंनद कसा देता येईल. विद्यार्थीं जन्मदिवस शिक्षकांकडून माहिती करून घेतात व आपल्या सहकारी मित्रांना चॉकलेट नेत असतात विद्यार्थी आपल्या कलाकृती मधुन पुष्पगुच्छ तयार करुन शुभेच्छा देत असतात. या माध्यमातून लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असते. विद्यार्थ्यांमध्ये अशा कौतुकास्पद उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण होत असते. विद्यार्थी शब्द सुमनाने शुभेच्छा देऊन आनंद साजरा करत असतात. आज असाच वर्ग 3 रा चा विद्यार्थी संचित ओमप्रकाश नाकतोडे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अमर गाडगे प्रत्रकार, मनोज नाकतोडे, मयूर भरै, रवि सहारे, रोहित सहारे, रोशन तुपट, जागेश्वर ठाकरे, कमलेश नाकतोडे, आदी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.