माजरी ग्रामपंचायत च्या १४ व्या वित्त आयोग निधीचा कितीदा गैरवापर ?…

माजरी – भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या माजरी ग्रामपंचायत मध्ये १४व्या वित्तायोगतील विकासकामांचा निधी मध्ये सन २०१५-२०१६, ते २०१७-२०१८ च्या कालावधीत प.स.भद्रावती ग्रा.प.माजरी येथील परिच्छेद क्रमांक १० बेसलाईन मध्ये एकूण नावे १४९ असून एकूण रक्कम एकोणविस लाख आठ हजार रुपये अनुदान वाटप दाखविला आहे याबाबत लेखा परीक्षणात खालील अभिप्राय आहेत सदर बेसलाईनबाबत सर्वेनुसार नाव यादीत नसतांना समबंधिताना नियमबाह्य अनुदान वाटपबाबत गैरव्यवहार झाले होते यात सरपंच सौ.इंदूताई कुमरे ह्या प्रकरणात दोषी ठरलेल्या आहेत असे निदर्शनास आले आणि त्यामुळे अप्पर आयुक्त विभाग नागपूर यांच्या न्यायालयाने पूर्वीच्या सरपंच सौ इंदु कुमरे ह्याना दिनांक १३ मे २०१९ रोजी सरपंच पदासाठी अपात्र घोषित केले गेल्या होते दरम्यान या प्रकरणात माजरी ग्रामपंचायत तथा ग्रामविकास अधिकारी एस. एस. आंदे यांचे कडे सदरील प्रकरणात च्या दरम्यान माजरी ग्रामपंचायत येथील कार्यभार होता परंतु सध्यपरिस्थितीत त्यांची माजरी येथून बदली झालेली आहे दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर १४व्या वित्तायोगतील गैरव्यवहार झालेल्या शासकीय निधीची अजूनही परतफेड झालेली नाही तसेच माजी सरपंच कार्यभार सोडून जवळपास अंदाजे ७ ते ८महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे परंतु त्यांचे सदस्यपद अजूनही कायम आहे दरम्यान गैरव्यवहार झालेल्या प्रकरणात अजूनही कठोर कार्यवाही झाली नाही व गैरव्यवहार झालेला शासकीयनिधी अजूनही माजरी ग्रा.प.ला भरणा करण्यात आला नाही यामुळे माजरी ग्रामपंचायत चे शासकीय नुकसान झाल्याचे दिसून येत आहे याप्रकरणी अपहार झालेली रक्कम अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने वसूल का केली नाही याबाबत माजरी वाशियाकडून बोलले जात आहे दरम्यान याच कालावधीत प्रभारी सरपंच सौ .शर्मिला प्रवीण आमटे यांचेवर पण १४ वा वित्तायोगतील शासकीय निधीचा ९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केले असा आरोप विरोधात बसलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे
त्यामध्ये किती सत्यता आहे ही पडताळणी व जाब विचारण्यासाठी गेल्यास पत्रकारांना प्रतिउत्तर देतांना सरपंच सौ शर्मिला प्रवीण आमटे यांनी लेखी स्वरूपात आरोपांचे खंडन करत सांगितले की माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप हे खोटे आहेत कारण ग्रामपंचायत माजरी येथील सर्व साहित्य खरेदी केले गेले ते सर्व साहित्य ई टेंडर परवानाधारक असलेल्या दुकानातूनच केली गेली व साहित्याची खरेदीची किंमतीची संपूर्ण बिले ही आमचेकडे उपलब्ध आहेत दरम्यान आमच्यावर केलेले सर्व आरोप हे विरोधी सदस्याने सिद्ध करून दाखवावे असे सांगितले .परंतु त्यांच्या या बोलण्यात किती तथ्य आहे हे चौकशीदरम्यानच पुढे येईल असे मत गावकऱ्यांनी वेक्त केले आहे वरील सर्व अफरातफर प्रकरणे दरपंचवार्षिक मध्येच का होतात का? व माजरी ग्रामपंचायत ला कोट्यवधीचा निधी येतो हा खरंच माजरी ग्रामपंचायत मार्फत गावाच्या विकासासाठी खर्च होत आहे की नाही यावर नियमित उच्च अधिकाऱ्यांची देखरेख असावी असे गावकऱ्यांचे मत आहे व हा शासकीय निधी सरपंच व सदस्यांच्या विकासासाठी आहे की गावाच्या विकासासाठी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे ? पण या सर्व प्रकरणात माजरी ग्रामवाशी सध्यपरिस्थितीत गप्प बसून आहेत परंतु ग्रामपंचायत च्या या नियमित गैरव्यवहार प्रकरणाला कंटाळून असल्याचे दिसून येत व याबाबतची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याचे कडे लेखी करावी तसेच जनतेतून मूक व तोंडी स्वरूपात बोलले जात आहे .

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.