प्राथमिक आरोग्य केंद्र हिवराबाजार येथे नविन रूग्ण कल्यान समितीचे गठण….

शरद नागदेवे, नागपूर
नागपूर – रामटेक – आज दि.१३/२/२०२० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवराबाजार येथील सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेत नविन रूग्ण कल्यान समितीचे गठण करण्यात आले.
हिवरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य कैलास राऊत, सहअध्यक्ष पदी, जिल्हा परिषद सदस्य शांताबाई कुंमरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन नाईकवार,सचिव-प्रभारी वैद्यकीय अधिकारी हिवरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ.प्राजक्ता गुप्ता, नामनिर्देश सदस्य, रामटेक पंचायत समितीच्या सभापती कलावती ठाकरे, राजेंद्र बागडे, गणेश चौधरी,भुमेश्वरी कुभंलकर, संजय नेवारे,रमेश बमनोटे,कैलास लवाते,सरिता मरखाम,बी.डब्लु.यावले,एम.डी.करनैवार, संगीता तभाने,यांची निवड करण्यात आली.
नियोजित सभेत परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत उत्तम आरोग्य सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मेचाऱ्यांन कडुन परिसरातील नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.नवनिर्वाचित पदिधिकारी आणि सदस्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.प्राथमिक आरोग्य रुग्ण कल्यान गठण समिती स्थापना प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती गेडाम, डॉ.प्रकाश गणवीर, आरोग्य सहाय्यक माधव धुर्वे, लिपिक पंकज राऊत,राजानंद डांगे, आरोग्यसेवक प्रभाकर बुधे, भिमशंकर ईसलवार,हरिष नगरे,संजय राठोड, आरोग्यसेविका सिमा देवळेकर,परिचारक बळीराम बेले,कल्यानी सलामे,बसंती आजाम उपस्थित होते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.