मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाच वर्ष तुरुंगवास…

डेस्क न्यूज  – मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या दोन प्रकरणात पाकिस्तानी न्यायालायने सईदला दोषी धरले आहे. न्यायालायने त्याला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी ही शिक्षा सुनावली.

संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्या सईदवर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे इनाम ठेवले होते. दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याच्या प्रकरणात १७ जुलैला त्याला अटक झाली होती. सईदला लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये ठेवण्यात आले होते. लाहोर आणि गुजरनवाला शहरात सईद विरोधात दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणात न्यायालयाने सईदला प्रत्येकी साडेपाच वर्ष तुरुंगवास आणि १५ हजार दंड ठोठावला आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.