कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या!…

प्रतिनिधी ; राहुल मेस्त्री…
कसबा सांगाव ता.कागल येथील 26 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. 12 रोजी रात्री दहाच्या दरम्यान घडली आहे. अमित बाबासो शमनवाडे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मयत झालेला 26 वर्षीय तरुण हा मनोरुग्ण असुन आपल्या लहरींच्या नादात आपल्या राहत्या घरातील स्टोअर रुममधील लाकडी तुळीला असलेल्या लोखंडी हुकाला पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीच्या सहाय्याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केली आहे..

मृतदेहाचे शवविच्छेदन कागल ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला..सदर घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली असून कागल पोलीस पुढील तपास करत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here