ग्रामपंचगव्हाण येथे २६ अवैध घरगुती सिलेंडरसह मारोती व्हॅन जप्त…

पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक व पुरवठा विभागाची संयुक्त कारवाई.एकुण १,५२,७५०/रूपयांचा मुद्देमाल जप्त. आज दि.०३.१०.२०२० रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक तसेच पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की

तेल्हारा तालुक्यातील ग्राम पंचगव्हाण येथे काही लोक हे त्यांच्या आर्थीक फायदयाकरीता गावातील लोकांकडून लार्ड गोळा करून अवैधरित्या सिलेंडर विकत आणून भरवस्तीत त्यांच्या राहत्या घरी व दुकानात सिलेंडरची साठवणूक करीत आहेत. त्यांनी याचा कालाबाजार मांडला असून गावातील लोकांच्या जीवीतास मोठया प्रमाणात धोका उत्पन्न झाला आहे.

अशी माहिती मिळाल्यावरून नमूद दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या ग्राम खेलकृष्णाजी पंचगव्हाण येथे धाड टाकली असता अनुक्रमे १) आरोपी नामे मयुर प्रभाकर उडतकार वय २९ वर्षे २)प्रवीण सुधाकर उहतवार वा ३० वर्षे ३) कैलास भास्कर टेकाडे वय ३८ वर्षे सर्व रा.पंचगव्हाणयाच्याकडून अनुक्रमे १) घरगुती वापराये एलपीजी ०९ सिलेंडर किंमत १८,१५०/- २) घरगुती वापटाचे एलपीजीचे १५ सिलेंडर किंमत २३,४५०/- )

घरगुती वापराचे एलपीजीचे ०२ सिलेंडर किंमत ३७५०/- तसेच एक ओमजी लॅन क्रमांक एम एच २० बीसी ९४३४ किंमत १00,000/- रुपये, कॉनमध्ये बॉस भरण्याकरीता उपयोगी इलेक्टीक मशीन किंमत ७000/-, ०२ हॉस पाईप रेग्युलेटरसह असा एकूम १,५२, ७५०/- रुपये तसेच गावातील लोकांचे एकूस १०३ घरगुती गॅस वापरण्याचे पुस्तके जपा करण्यात आली आहेत.

तिन्ही आरोपीला पो स्टे तेल्हारा येथे जिवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नमूद कारवाई ही मा. श्री.जित पापकर, जिल्हाधिकारी अकोला, मा.श्री. जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मिलिंदकूमार अ.बहावर पोलीस निरिक्षक विशेष पथक अकोला यांच्या पथकाने व श्री रवींद्र चंद्रकांत यागावार पुरवठा निरिक्षण अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, श्री संतोष कुटे, पुरवठा निरिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय अकोला तसेय श्री निलेश का पुरवठा निरिक्षक तेल्हारा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here