मानखेड जिल्हा परिषद शाळेत बाल महोत्सव उत्साहात साजरा…

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

अहमदपुर जि.प.प्रा.शाळा मानखेड ता.अहमदपुर येथे दि.११ फेब्रुवारी रोजी बालकांचा कलाविष्कार सोहळा म्हणजेच “बाल महोत्सव” उत्साहात संपन्न झाला. सदरील बालमोहत्सवाचे उदघाटन अहमदपूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापुजनाने व दीपप्रज्वलन करून झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख मा.श्री.मोहनराव
जाधव , केंद्रीय मुख्याध्यापक प्रल्हाद केंद्रे, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष धनंजय उजनकर,राज्य आदर्श शिक्षक मा
माधव केंद्रे ,महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे विभागीय कार्याध्यक्ष शंकरराव कदम, नांदुरा केंद्राचे मु.अ.राजकुमार नलवाड, कें.प्रा.शा.सांगवीचे मु.अ.दिलीप कापसे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ केंद्रे ,बिआरसीचे विषय साधनव्यक्ती डी. बी. सुकरे, मूल्यवर्धन तालुका समन्वयक दहिफळे सर, आेमप्रकाश गुरमे, नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
बबनराव ढोकाडे यांना लातूर जिल्हा परिषदेचा “उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे, व “आदर्श केंद्रप्रमुख” पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मोहनरावजी जाधव यांचा मानखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी गिरी यांनी सत्कार केला.यावेळी उपाध्यक्ष श्री. अच्युत जाधव व पालकांच्या हस्ते ही सत्कारमुर्तीचा सत्कार संपन्न झाला.
जि. प. प्रा. शा. मानखेडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार कलाविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून शहरातील शाळेच्या तुलनेत अधिकची कला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवल्यामुळे पालक वर्गातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मोठे कौतुक होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक जीवन नवटक्के यांनी तर आभार सहशिक्षीका तथा स्नेहसंमेलनाच्या नृत्यदिग्दर्शका श्रीमती शांता मद्देवाड यांनी मानले.

 

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.