धम्म कार्यात युवकांनी स्वतःला समर्पित करावे…

अमरदीप लोखंडे. 11/2/20
ब्रम्हपुरी — बुद्ध धम्म हा धर्म नव्हे तर धम्म आहे. धर्म अनिष्ट रूढी-परंपरांना व माणसामाणसात भेद करणारा विषमतावादी विचारसरणी बहुजनांवर लादून गुलाम करणारा आहे. तर धम्म हा सर्व सजीव सृष्टी नैसर्गिक रित्या समानता प्रदान करणारा आहे.खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म हा स्वातंत्र्य ,समता,बंधुता, हक्क देणारा मानव कल्याणकारी धम्म आहे ज्या राष्ट्रांनी बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान स्वीकारले ते राष्ट्र प्रगतिपथावर आहे. सध्याच्या परिस्थितीत बौद्ध धम्म आणि चळवळीला गतीमान करण्यासाठी युवकांनी धम्म कार्यात स्वतःला समर्पित करावे असे आवाहन प्रशांत डांगे सामाजिक कार्यकता तथा पत्रकार यांनी आयोजित नान्होरी येथे पवारणा धम्म भूमी दिघोरी (नान्होरी ) यांच्या विद्यमाने माघ पौर्णिमा निमित्य दी.९ फेब्र.२०२० ला आयोजित बौध्द धम्म धम्म परिषदेच्या तिसऱ्या सत्रातील कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
‌ तालुक्यातील नान्होरी येथे दिनांक 9 फेब्रुवारीला पवणार धम्म भूमी दीघोरी (नान्होरी) येथे बुद्ध धम्म परिषद चे आयोजन करण्यात आले . एक दिवसीय धम्म परिषदेत तीन सत्रात कार्यक्रम घेण्यात आला.यात पहिले सत्र पुज्यनिय भंते शिलरत्न गोंगली,भंते उपाली अमरावती,भंते इन्द्रजोती पालंदुर, भंते जिवक नागपूर यांच्या उपस्थितीत धम्म ध्वजारोहण करून मान्यवरांच्या हस्ते रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते मारोतरावजी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.दुसऱ्या सत्रात भिक्खू संघाची धम्म देसाना घेण्यात आली.तिसऱ्या सत्रात सत्कार समारंभ व व्याख्यान माला घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्धघाटक डॉ.नामदेव खोब्रागडे अध्यक्ष प्रशांत डांगे सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार ब्रम्हपुरी प्रमुख वक्ते प्रा.नरेश रामटेके ब्रम्हपुरी, डॉ. चंद्रशेखर कौशल( बांबोडे) आंबेडकरी विचारवंत तथा बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक वडसा , इंजि.विजय मेश्राम कवि तथा आंबेडकरी विचारवंत वडसा , रत्न घोष नान्ह्योरीकर गडचिरोली, पुष्पा मेश्राम सरपंच दिघोरी, भुमिदान कर्ते शंकर शिंगाडे,मदन शेंडे समिती अध्यक्ष,किशोर खापर्डे समिती सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध धम्मपरिषद चे आयोजन करण्यात आले सायंकाळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्रकाश मेश्राम प्रस्तुत वादळ निळ्या क्रांतीचे प्रबोधन संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला.
‌ बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वितेकरिता अमरदीप शंभरकर, सुभाष रामटेके, किशोर मेंढे रणजित शेंडे, काकाजी मेश्राम ,अशोक मेश्राम विशंकर भानारकर, उज्वला राऊत , हिरकण्या घरडे, तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन व आभार प्रदर्शन विद्या सुखदेवे यांनी केले.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.